न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- कासारवाडी येथे ‘सदृढ आरोग्य व उत्तम जीवनाचे रहस्य’ याबाबत आयोजक राजेश्वर कलशेट्टी आणि सावित्री कलशेट्टी यांच्या वतीने (दि. २९) रोजी सेमिनार आयोजित करण्यात आले होते.
भारतीय योग संस्था, नवचैतन्य हस्य क्लब आणि जेष्ठ नागरी संघ कासारवाडी यांच्या सदस्यांनी भरीव मदत केली. हे सेमिनार के पी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन च्या अंतर्गत आयोजित करण्यात आले.
यावेळी राजेश्वर काशिनाथ कलशेट्टी आणि त्यांचा पूर्ण परिवार, मा. नगरसेविका आशाताई शेंडगे, अंकुश भामे, विजय मानकर, सुहास बोरावके, प्रशांत तनपुरे आणि देवकर तसेच कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, पुणे, मुंबई येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सेमिनारमध्ये, वक्त्यांनी उत्तम जीवन आणि उत्तम आरोग्य मिळवण्याच्या पद्धती डीकोड केल्या. स्पीकर हे यूएसए मधील नेतृत्व, व्यवसाय आणि आरोग्यामध्ये प्रमाणित प्रशिक्षक होते. कलशेटटी यांनी सहज जिवन जगताना येणाऱ्या समस्या व त्यावर मात करण्याचा उपाय छोटा व मार्मिक गोष्टीच्या माध्यमातुन साध्या व सोप्या बदलातुन जिवनाच्या सकारात्मक बदलाचा राजमार्ग सांगीतला.