न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ३० एप्रिल २०१९) :- निगडी येथील सच्चिदानंद एज्युकेशन सोसायटी संचलित विद्यानंद भवन विद्यालयाच्या ३५ व्या वर्धापनदिना निमित्ताने आयोजित केलेला माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात व आनंदात पार पडला.
यावेळी गेल्या ३५ वर्षातील शेकडो विद्यार्थी सहकुटुंब उपस्थित होते. या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी आपली शाळा आणि त्यावेळचे शिक्षक व यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेतील जुने सहकारी मित्र व शिक्षक कित्येक वर्षानी भेटल्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदित व उत्साहीत झाले होते.
अगदी सुरुवातीच्या बॅचपासूनच्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
शाळेसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल चंद्रशेखर कुलकर्णी, फिओना फर्नांडिस, रोहिणी राजोपाध्ये, विशाखा रानडे, छाया हब्बू या जुन्या आणि कर्तबगार शिक्षकांचा मानपत्र देऊन सच्चिदानंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विश्वस्त डॉ. जे जी पाटील, प्रा डी आर करनुरे, मुख्याध्यापिका छाया हब्बू, सविता किरंगे उपस्थित होते.
३५ वर्षापासूनच्या अनेक माजी विदयार्थ्यांना एकत्रित करून भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभू अय्यर, निलेश कुर्मी, आकाश सेंगर, कल्पेश जावया, आशीष रेघे, उल्हास म्हापूसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन साहेबराव जाधव, जया श्रीनिवासन यांनी केले, तर आभार निर्मला फ्रान्सिस यांनी मानले.











