- नियोजित प्रकल्पा (‘Merge in & Merge out’) चा आराखडा ऑनलाईन जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- दापोडी ते निगडी ६१ मी रूंदीचा रस्ता हा जुना मुंबई-पुणे रस्त्याचा भाग असुन वाहतुकीच्या दृष्टीने परिवर्तनाच्या मार्गावर आहे. शहरीकरण व नागरिकरणामुळे विविध सार्वजनिक वाहतूक पर्याय निवडणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने सकारात्मक नियोजन करुन नजिकच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक व मोटार विरहित वाहतुक व सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उभारण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. तसेच, या रस्त्यावर महामेट्रो मार्फत मार्गिका क्र. १ चे काम पीसीएमसी स्टेशनपर्यंत करण्यात आले असून, मार्गिकेचे विस्तारीकरण भक्ती-शक्ती चौक निगडीपर्यंत करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने, दापोडी ते निगडी या मुंबई-पुणे रस्त्याच्या सेवा रस्त्याचे व आतील द्रुतगती महामार्गाचे Merge in & Merge out सुधारित नियोजन करुन महानगरपालिकेने पुनर्बांधकाम करन्याची सुरुवात केली आहे. नियोजन करत असताना याबाबत नागरिकांच्या सुचना/हरकती मागविणेत आलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने वाहतुक विभागाकडील अधिकारी व नागरिक यांच्यासमवेत बैठक घेवुन सर्वानुमते या रस्त्यावरील अस्तित्वातील Merge in & Merge out चे नियोजन अंतिम करण्यात आलेले आहे. त्याचे नव्याने नियोजित केलेले Merge in & Merge out याचा आराखडा महानगरपालिकेच्या Website व स्मार्ट सिटी Website App येथे पाहण्यास उपलब्ध करून देणेत आलेला आहे.
नागरिकांनी याबाबत दखल घेऊन सुरळीत वाहतुक होणेच्या दृष्टीने महानगरपालिकेस सहकार्य करावे. हा आराखडा महानगरपालिकेच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in, स्मार्टसिटी संकेतस्थळ www.smartpcmc.org यावरुन अवलोकनार्थ उपलब्ध आहे.












