- तर, काही ठिकाण ‘नो-पार्किंग झोन’ जाहीर..
- वाहतूक पोलिसांच्या आदेशाची आजपासून अंमलबजावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- मेट्रो प्रकल्पासाठी मदर टेरेसा फ्लाय ओव्हर ते भक्ती शक्ती चौक दरम्यान माती परिक्षणासाठी ८१ ठिकाणी लॉग बोअर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात येणार आहेत. त्याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखेच्या वतीने मंगळवारी (दि. २८) पासुन अंमलबजावणीबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
- निगडी वाहतूक विभागांतर्गत भक्ती शक्ती चौकाकडून येणारी जड-अवजड वाहने ही टिळक चौकाकडे न जाता भक्ती शक्ती सर्कल वरुन अंकुश चौक, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर मार्गे थरमॅक्स चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- तसेच भक्ती शक्ती चौकाकडुन येणारी लक्झरी बसेस या टिळक चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे न जाता त्या भेळ चौक-संभाजी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- दुर्गानगर चौकाकडुन येणारी जड अवजड वाहने डावीकडून खंडोबामाळ चौकाकडे न वळता सरळ भेळ चौक संभाजीनगर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- खंडोबामाळ चौकाकडुन पिंपरीकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या जड अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- टिळक चौकापासुन काळभोरनगर अंडरपासपासुन पुढे बीआरटी मधून जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
- दरम्यान भक्ती शक्ती चौकापासुन ते काळभोरनगर अंडरपासपर्यंत तसेच काळभोरनगर अंडरपासपासुन ते भक्ती शक्ती चौक दरम्यान दोन्ही बाजूस नो-पार्किंग झोन करण्यात आला आहे.











