मुलीच्या प्रियकरासह दोघांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- देहविक्री करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून दोघांनी १६ वर्षीय तरुणीला मुळगावी सोडवण्याचे कारण देत लोणावळा येथे रेल्वेने नेले. पुन्हा सोमाटणे फाटा येथे आणले. तीथून आरोपी १ याच्या प्लॅटिना दुचाकीवरून शिरगाव येथे आरोपी क्र २ हिचे वडील भाडयाने राहत असलेल्या खोलीत घेवून आले. त्यानंतर गोडंब्रे येथिल पवना नदीच्या छोटया पुलावर अंधारात घेवून नेले.
तिथे आरोपी २ हिने तरुणीच्या मानेच्या पाठीमागील बाजूस चाकुने व आरोपी क्र १ याने गळा दाबून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान तरुणीचे आरोपी क्र ३ याच्याशी प्रेमसंबंध होते. हि घटना (दि. २६ ते दि. २७) दरम्यान ०१.४५ वा चे दरम्यान घडली.
१६ वर्षीय तरुणीने आरोपी १) पवनकुमार आयोध्या प्रसाद (वय २३ वर्षे मुळ रा. रामपुर बेला, बेला रामपूर, ता. पट्टी, जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश), २) अंजू गोबरी यादव (वय ३९ वर्षे मुळ रा. फतेहपुर भटौली, द्रपुर, जि. देवरिया, उत्तरप्रदेश), ३) दिपक गोबरी यादव (वय २१ वर्षे रा. फतेहपुर भटौली, रुद्रपुर, जि. देवरिया, उत्तरप्रदेश) या तिघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
शिरगाव पोलिसांनी १५४/२०२४ भा.दं.वि कलम ३०७, ३६६(अ),३६८,१०७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोउपनि पारखे पुढील तपास करीत आहेत.











