न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. २८ मे २०२४) :- दहावी बोर्ड परीक्षेची मागील 14 वर्षापासून अतिशय उत्कृष्ट निकालाची परंपरा आजही जैन इंग्लिश स्कूल ने जपली आहे. यावर्षी शाळेचे एकूण 84 परीक्षार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकीसर्व 84 विद्यार्थी घवघवीत यश संपादित करून उत्तीर्ण झाले. यामध्ये 95% पेक्षा जास्त गुण संपादित करून एकूण 6 विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव मावळ तालुक्यात उज्वल केले आहे.
90% पेक्षा जास्त गुण मिळवून एकूण 18 विद्यार्थी यशस्वी झाले 80 ते 89% गुण संपादित करून एकूण 31 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. 24 विद्यार्थ्यांनी 70 ते 79 टक्के प्राप्त करून यश संपादित केले. पाच विद्यार्थ्यांनी 60 ते 69 टक्क्यांमध्ये प्राविण्य मिळवले विशेष आनंदाची बाब म्हणजे शाळेचे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीच्या वरील टक्केवारीत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेचा विद्यार्थी चिन्मय विनीत जोशी हा 98.20% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. श्रेयस संतोष भेगडे याने 96.20% मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच अनन्या उदय भेगडे या विद्यार्थिनीने 96% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादित केला.
हर्षिता उमेश गवळी या विद्यार्थिनी ने 95.60 गुण प्राप्त करून चतुर्थ क्रमांक मिळवून यश संपादित केले तसेच पारस अविनाश वाजे 95.40 टक्के मिळवून पाचव्या क्रमांकावर यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नांना मिळालेले यश ही त्यांच्या उत्कृष्ट निकालाची पावतीच आहे असे अभिनंदन करून मुख्याध्यापिका सौ विजया शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे चेअरमन सर्व संचालक सदस्य मुख्याध्यापिका अपूर्वा टकले, शुभांगी भोईरशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.