न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- निगडीतील अंकुश चौक मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपूलाकडे जाणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाने अंकुश चौक मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपूल येथील रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवला आहे. पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब दखल घेऊन अंकुश चौक मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपूल रस्ता दुरुस्ती करण्यात यावी.
तसेच ज्या ठेकेदाराने अंकुश चौक मार्गे भक्ती शक्ती उड्डाणपूल रस्ता बनवला आहे, त्या ठेकेदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांना काळया यादीमध्ये टाकावे, अशी मागणी शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

















