न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- बिअर शॉपीमध्ये काम करत असताना तोतया पोलीस अधिकारी तिथे आला. त्याने पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगुन बनाव करुन धमकावले.
फिर्यादीच्या दुकानातुन ४५६० रु. किं.चे ०२ ट्युबर्ग बिअरचे बॉक्स त्यामध्ये एकुण २४ बॉटल खंडणी स्वरुपात घेतले. हा प्रकार (दि. ३० /०५/२०२४) रोजी रात्री ९.३० वा. चे. सुमा मौजे पाईटगावचे हद्दीत, आर्या बिअर शॉपी नावाचे बिअर शॉपमध्ये ता. खेड जि.पुणे येथे घडला.
सचिन भाऊ वाळुंज (वय ४८ वर्षे, व्यवसाय बिअर शॉपी) यांनी आरोपी गणेश ज्ञानेश्वर चव्हाण (वय ३८ वर्षे रा. गाथा आरंभ सोसायटी, परंडवाल चौक देहू) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३३७/२०२४ भा.द.वि.कलम ३८४, १७० नुसार गुन्हा दाखल करीत तोतया पोलिसाला अटक केली आहे. पोउपनि दत्तात्रय जाधव पुढील तपास करीत आहेत.