- महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी अशी असले पार्किंग व्यवस्था…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- मावळ लोकसभा निवडणुक २०२४ ची मतमोजनी ही बालेवाडी स्टेडीयम येथे मंगळवार (दि. ०४) रोजी होणार आहे. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत राहणार आहेत. वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मतमोजनी शांततेत व सुरळीतपणे पार पडावी यासाठी वाहतुक मार्गात बदल तसेच पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, असे वाहतुक शाखा पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे.
दरम्यान हिंजवडी, वाहतुक विभागांतर्गत (दि.० ४) रोजी सकाळी ५.०० ते रात्री ११.३० या वेळेमध्ये बालेवाडी स्टेडीयम मेन गेट समोरील रस्ता उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक ते म्हाळुंगे पोलीस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. त्यासाठी चांदे नांदे व म्हाळुंगे गावातुन येणारी वाहने ही उत्तम स्विट (पुणेरी स्विट) चौक येथुन उजवीकडे वळुन म्हाळुंगे पोलीस चौकी येथुन पुढे राधा चौकाकडे व इच्छितस्थळी जातील. राधा चौकातुन येणारी वाहने ही म्हाळुंगे पोलीस चौकी येथे डावीकडे वळुन पुढे म्हाळुंगे गाव, चांदे- नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील. (दि.०४) रोजी सकाळी ५.०० ते रात्री ११.३० या वेळेत जड व अवजड वाहनांना म्हाळुंगे गाव ते राधा चौक आणि राधा चौक ते म्हाळुंगे गाव या मार्गावर प्रवेश बंद राहील. चांदे नांदे येथुन येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथुन डावीकडे वळुन माण मार्गे हिंजवडी येथे येवुन इच्छित स्थळी जातील व बाणेर रोड व राष्ट्रीय महामार्गावरुन येणारी जड अवजड वाहने ही राधा चौकातुन उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी व पुढे इच्छित स्थळी जातील.
पार्किंग व्यवस्था….
म्हाळुंगे पोलीस चौकी ते उत्तम स्विट (पुणेरी स्वीट) चौक या मधला रस्ता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना थांबणेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी राधा चौकातुन पुढे डाव्या बाजुला खंडोबामंदीराचे पाठिमागील मोकळ्या जागेमध्ये पार्कीगकरीता व्यवस्था करण्यात आली आहे.
र्ऑर्किड हॉटेल हायवे गेट पासुन सुरू होणारा सर्व्हस रोड हा मुळा नदी ब्रिज पर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्यात येत असुन हा रस्ता महायुतीचे कार्यकर्त्यांना थांबण्यासाठी राखीव ठेवण्यात येत आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यासाठी पार्किंगची व्यवस्था त्या सव्हींस रस्त्यावर करण्यात येत आहे. इतर पक्षाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांचेसाठी माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे या शाळेमध्ये पार्कीगची व्यवस्था करण्यात आली आहे.
(दि.०४) रोजी सकाळी ०५.०० पासुन रात्री ११.३० पर्यंत आवश्यकतेनुसार गर्दी संपेपर्यंत अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत वाहतुक वळविण्यात आली आहे. याबाबत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक पोलीसांकडुन करण्यात आले आहे.











