- वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी सरकारी हॉस्पीटलमध्ये हलविले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२४) :- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील (रा. तळेगाव दाभाडे) यांनी त्यांच्या लाल रंगाची स्कॉर्पीओ गाडी (क्र. एम.एच. 13 ई.सी. 9633) भरधाव वेगात चालवली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलो वोल्क्सवॅगन गाडीला मागून धडक देऊन तीचे नुकसान केले. तसेच त्या गाडीच्या समोर उभ्या असलेल्या ब्रिझा गाडीचे देखील नुकसान झाले आहे.
तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक दरम्यानच्या रोडवर, काका हालवाई दुकानाच्या जवळ हा अपघात (दि. ०१) रोजी दुपारी २.४० च्या सुमारास घडला. याबाबत फिर्यादी सिध्दाराम इरप्पा लोणीकर (वय- 37 वर्षे, धंदा- कंट्रशन, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी तक्रारी दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी रजि. नं. 309/2024 भा.द.वि. कलम 279, 336, 427, सह मो.वा.का. कलम 184, 185, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. अपघात करणा-या गाडीचे चालक एन.के. पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी करीता त्यांना सरकारी हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावर हे करीत आहेत.