न्यूज पीसीएमसी नेटवर्क
गडचिरोली (दि. १ मे २०१९) :- महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला आहे. नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला केला आहे.
जांभूळखेडा गावाजवळील ही घटना आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. या बरोबरच जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीच्या चालकाचाही या भीषण हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा आहे. नक्षलवाद्यांकडून लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा आहे. हा हल्ला अत्यंत दुर्दैवी असून याचा निषेध करावा तेवढा कमीच, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.











