न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला मिळालेले अपयश बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळे करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठांकडे करून पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. यामुळे फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये आणि दिला तर आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊ, अशी घोषणा अनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीची कामगिरी चांगली झाली नसून त्यांनी फक्त १७ जागा जिंकल्याचे सांगण्यात आले आहे. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी चक्क पदाचा राजीनामा देऊन मला पराभव मान्य आहे असे म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आता ते खरंच राजीनामा देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी मी घेत असून पक्षाने मला पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मला पराभव मान्य असून नेतृत्वातून बाहेर करावे असे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी सरकारमधून मोकळे करण्यात यावे अशी पक्षाकडे मागणी केली होती.
विरोधक सरकारविरोधात नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाले असे यावेळी सांगण्यात आले. संविधान विरोधी, शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. त्यामुळे विरोधी पक्षाला याचा मोठ्या प्रमाणावर यश आल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पण देवेंद्र फडणवीस यांच्या अशा बोलण्यामुळे भाजपची पंचाईत झाली आहे.