न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२४) :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त (दि. १०) रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘संकल्प महापदनियुक्तीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रांताध्यक्ष जयंतज पाटील, राज राजापूरकर प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पक्ष संघटनेतील गटबाजीमुळे झालेल्या पडझडीनंतर संघटनेला पुन्हा बळकट करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहतील ओबीसी बांधवांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी केले आहे.


















