- कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२४) :- खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील चांडोली गावातील महावितरण कार्यालयात बिबट्या शिरल्याची घटना आज बुधवारी (दि. १०) रोजी घडली आहे. महावितरण कार्यालयात शिरलेल्या बिबट्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला थेट महावितरण कार्यालयात कोंडलं.
मागील पाच दिवसांपासुन बिबट्या मादीसह बछडे महावितरण कार्यालगत दिसुन आले होते. बिबट्या महावितरण कार्यालयात शिरल्यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घामु फुटला होता. बिबट्याने त्यांची पळता भुई थोडी केल्याची घटना घडली.
दरम्यान, बिबट्या कार्यालयात घुसला आणि नंतर दरवाजा बंद केला. त्याची माहिती मिळाल्यावर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली. काही वेळाने वनविभागाचे पथक या ठिकाणी आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.