- नागसेन सावदेकर व कुणाल वराळे यांचा भीमबाणा संगीतमय कार्यक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त बहुजन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (५ मे) सायं. ७ वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक नागसेन सावदेकर व कुणाल वराळे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष मनोज तोरडमल यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, प्रमुख पाहुणे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश सदस्य अमित गोरखे, उमा खापरे, पक्षनेते एकनाथ पवार, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, शहर भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदींसह आजी-माजी नगरसेवक व फुले-शाहू-आंबेडकर प्रेमी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजनात बहुजन संघर्ष प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बुद्धीसागर आठवले, उपाध्यक्ष शेषराव लोमटे, दादा गणगे, श्रीकांत वाघमारे, राहुल जगताप, कल्याण शिंदे, श्रीनिवास सोनवणे, पप्पू अडागळे, सचिन वाघमारे, दीपक तोरडमल, सुनील सोनवणे, अनंता मस्के, लहू मस्के, स्वप्निल बनसोडे, महावीर जगताप, उत्रेश्वर पालके, प्रदीप कसबे, युवराज जगताप, कचरू पालके, भगवान शिंदे, हनुमंत कसबे, प्रसाद केसरे, सलमान शेख, यशवंत दणाने, गणेश साठे, रमेश मगर, उमेश कांबळे, मारुती सोनटक्के, दीपक अडागळे, महेश भिसे, विनोद क्षिरसागर आदींना सहभाग घेतला आहे.











