न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- लातुर जिल्ह्य़ातील निलंगा या तालुक्यातील तळीखेड या गावात गावगुंडांने बहुजन वस्तीमधील मातंग समाजातील तात्याराव तुकाराम शिंदे या बांधवाचे घर जाळले आहे. व्यक्तीश: पोटात राग ठेवून त्याने हे कृत्य केले आहे, असे शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी म्हटले आहे. तसेच या कृतीचा निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे.
मातंग समाजाचे तात्याराव तुकाराम शिंदे हे पीडीत असून, मुलीच्या लग्नासाठी त्यांनी काबाडकष्ट करून, घरात दीड लाख रू. जमा करून ठेवले होते. ते दीड लाख रूपये जळून खाक झाले आहेत. तसेच या पीडितांना राहण्यासाठी घर नाही. या गावगुडांनी त्यांना बेघर केले आहे. याची नुकसान भरपाई शासनस्तरावर करण्यात यावी.
तसेच तळीखेड या गावातील विनोद अर्जुन पाटील या गावगुडांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. तसेच तात्काळ लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या कृत्याची दाखल घेत, आरोपींवर कारवाई करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असे दाखले यांनी सांगितले आहे.











