न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील यशवंत प्राईड या इमारतीची सीमाभिंत आज शनिवारी अचानक कोसळली असून, त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली इमारतीलगत राहणारे दोन नागरिक व एक ६ वर्षाचा मुलगा अडकला आहे.
नागरिकांनी अग्निशामक विभागास कळविले असून, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तत्पूर्वी दोघाजणांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले असून, त्यांना पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले आहे.
परंतु, अद्यापही ६ वर्षाचा मुलगा त्या भिंतीखालीच अडकला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकेश ठाकूर असे त्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलाचे नाव आहे. अग्निशामक विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे.











