न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आणि दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्यील प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप,सामाजिक कार्यकर्ते मयुर जाधव, भीमराव बरकडे, मयूर गायकवाड, मुख्य लिपीक वासिम कुरेशी, संदीप गव्हाणे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
निगडी येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच दिवंगत महापौर मधुकरराव पवळे आणि भक्ती शक्ती चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास देखील अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, विजय वायकर, निलेश देशमुख, माजी नगरसदस्य सचिन चिखले, शशिकिरण गवळी, भगवान शिंदे, मारुती भापकर, विनायक रणसुंभे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, मयूर जाधव, नाना कसबे, सतिश भवाळ, संदीप जाधव, गणेश साठे, मयूर गायकवाड, भीमराव बरकडे,संजय ससाणे,अरूण जोगदंड, शिवाजी साळवे, डी.पी. खंडाळे, नाना कांबळे, आबा मांडरे, रामदास कांबळे, रामेश्वर बावणे, सविता आव्हाड, उप अभियंता अभय कुलकर्णी,मीनल डोडल, कनिष्ठ अभियंता अमित बावनकर, पल्लवी सासे, सारिका नागरगोजे आदी उपस्थित होते.















