- सहा महिलांच्या टोळीकडून भिशीद्वारे अनेकांना कोटींचा गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- ‘भिशीमध्ये पैसे भरल्यानंतर नंतरचा नंबर घेतल्यास जास्ती पैसे मिळतील’ असं आमिष दाखविलं. त्यामुळे भिशीमध्ये सुरवातीचा नंबर न घेता अदयापपर्यंत ०८ हप्त्याचे एकुण ०२,२२,००० रुपये तरुणाने भरले. ते सभासदांनी सुरवातीच्या नंबरद्वारे काढुन घेतले.
त्यानंतर सभासदांनी भिशीमध्ये पैसे भरणे बंद केले. त्यामुळे भरलेले पैसे परत न करता तरुणाची आर्थिक फसवणुक केली. तसेच सभासदांनी इतर लोकांना भिशीमध्ये शेवटचे नंबर घेतल्यास जास्ती पैसे मिळतील, असे अमिष दाखवुन त्यांच्याकडुन देखील अंदाजे ०२.५० कोटी रुपये घेवुन त्याचे वाटप केले. त्यांनादेखील पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ रोजी पर्यंत साई मंदीर, साई नगरी कॉलनी, वडमुखवाडी येथे घडला. फिर्यादी बालाजी मसु सोनवणे यांनी सहा महिलांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. दिघी पोलिसांनी ३२९/२०२४ भा.दं. वि. कलम ४०६,४२० प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि रणवरे पुढील तपास करीत आहते.














