न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिशुविहार प्राथमिक विद्यालयात (दि. १) लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यामध्ये इयत्ता प्ले वर्गापासून इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. तसेच काही विद्यार्थी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत आले होते.
लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. योगिता काळे मॅडम व उपशिक्षक विकास गायकवाड यांनी केले. लोकमान्य टिळकांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षक प्रकाश कदम यांनी माहिती सांगितली.
प्ले वर्गाच्या वर्गशिक्षिका माधवी भोसले यांनी लोकमान्य टिळकांवर गाणे सादर केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर ढोले सर यांनी केले.











