न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२४) :- बोपखेलमध्ये बुधवारी दुपारी लहान मुलं खेळत असताना लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर दिघीतील गणेश नगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
गिरिजा गणेश शिंदे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. बुधवारी दुपारी गणेश नगरमध्ये चार मुलं खेळत होती. त्यापैकी दोघेजण लोखंडी गेटच्या आत गेले, त्यानंतर गिरिजा आणि तिची दुसरी सहकारी ठीक गेटच्या समोर आली.
तेव्हा दुसरा मुलगा गेट ओढत असताना ते शेकडो किलोचे गेट चिमुकलीच्या अंगावर पडलं. गेट खाली दबल्या गेल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.











