न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे. २०१९) :- पिंपळे गुरव येथील अग्रेसिया सोसायटी जवळ मोकळ्या मैदानात असलेल्या एका पत्र्याच्या शेडला अचानक आग लागून, घर जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला व त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संसार मात्र उघड्यावर पडला आहे. गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागली असल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली आहे. आग लागल्याची माहिती सोसायटीतील एका नागरिकाने दिली होती.











