- वकील बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ याचं आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर भाजपा कायदा आघाडीच्या वतीने भाजपा कायदा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा निमंत्रक अॅड. गोरखनाथ झोळ यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त लोकप्रतिनिधी, वकील बांधव आणि दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. ०३) रोजी सायं. ४.०० ते ७.०० वाजता चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे. कायदा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. उदय डबले हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.
या सोहळ्यात मावळचे खासदार श्रीरंग बारणे, नवनियुक्त विधानपरिषद आमदार अमित गोरखे, जेष्ठ विधिज्ञ एस. बी. चांडक, अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. व्हिक्टर पिंटो यांचा सन्मान आणि वकील बांधवांच्या गुणवंत मुलांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी शहर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आ. महेश लांडगे, आ. अश्विनी जगताप, आ. उमा खापरे, कायदा आघाडीचे प्रदेश प्रभारी अॅड. धमेंद्र खांडरे, मा. खासदार अमर साबळे, भाजपा राष्ट्रीय सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, पुणे अॅडव्होकेटस बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर, पिं.चिं. अॅडव्होकेटस बार असोशिएशनचे अध्यक्ष रामराजे भोसले, पिं.चिं. अॅडव्होकेटस बार असोशिएशनच्या अध्यक्षा अॅड. प्रमिला गाडे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, भोसरी विधानसभा प्रमुख विकास डोळस, जिल्हा चिटणीस नामदेव ढाके, विलास मडिगेरी, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, अजय पाताडे, शैलजा मोळक, महिला अध्यक्षा अॅड. पल्लवी विघ्ने सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास मोठ्या संख्यने वकील बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक अॅड. झोळ यांनी केले आहे.











