न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- रुपीनगर येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीपात्रात आढळून आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
‘पालकांना शाळेत घेऊन ये’ असे शिक्षकांनी त्याला सांगितले होते. त्यानंतर तो घरी आणि शाळेत आलाच नाही. तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या पालकांनी चिखली पोलिस ठाण्यात अर्पित याच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्याने अंगात शालेय गणवेश परिधान केला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अर्पित सूर्यकांत दुबे (वय १५ वर्षे, रा. पीसीएमसी काॅलनी, निगडी) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.











