न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२४) :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस क्रीडो सोलुशन पुण्याचे झोनल हेड सुरेश माहुरकर, ओंकार पाटील सेल्स मॅनजर पुणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी रिया परमार, श्रावणी सोळंकी, अर्पिता तिवारी, वाघमारे प्रिया, राहुल चौधरी, समृद्धी जगताप, विद्यार्थीनीनी तसेच निशा पवार, गीतांजली दुबे व तृप्ती शर्मा लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू राठी यांनी केले व आभार प्रदर्शन दिव्या सराफ यांनी केले.











