न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२४) :- मराठा सेवा संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंते आबासाहेब ढवळे यांची नुकतीच निवड झाली. यानिमित्त संभाजी ब्रिगेड शहर कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष ढवळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून आबासाहेब ढवळे हे संघटनेच्या कामकाजात सक्रिय आहेत. महापालिका निवृत्त अधिकारी अमृतराव सावंत यांच्यासोबत देखील त्यांनी संघाचे काम केले आहे. गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांच्या विचारांची परंपरा तसेच संताची विचारधारा पुढे घेऊन जाणा-या मराठा सेवा संघासोबतच्या कार्याचा आबासाहेब ढवळे यांना गाडा अनुभव आहे.
त्यांच्या रुपाने मराठा सेवा संघाला एक अभ्यासू आणि कार्यतत्पर नेतृत्व लाभल्याने संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी कार्यकारणीच्या वतीने आबासाहेब ढवळे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष आप्पासाहेब चांदवडे, उपाध्यक्ष तेजस गवई, कोषाध्यक्ष राजेश सातपुते, मुख्य संघटक परशुराम रोडे, माजी सैनिक मधुकरराव माने, रिक्षा संघटना शहराध्यक्ष नारायण बिरादार आदी उपस्थित होते.














