न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाच्या वतीने विविध दिव्यांग कल्याणकारी योजना राबविणेत येतात. या योजना अंतर्गत दि.२६/१२/२०२३ पासून ६० दिवसापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणा-या दिव्यांग व्यक्तींचा “हयातीचा दाखल्या” बाबत घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणेत आले होते. सर्वेक्षणाची मुदत दि.२६/०२/२०२४ रोजी संपल्याने दि.२७/०२/२०२४ पासून दि.२६/०३/२०२४ पर्यंत सर्वेक्षणाला मुदत वाढ देणेत आलेली होती.
अहवालानुसार अद्यापपर्यंत १३१२ लाभार्थ्यांचे राहण्याचे पत्ते अपूर्ण असून मोबाईल नंबर बंद, चूकीचे नंबर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे समाज विकास विभागाकडून दि.१९/०३/२०२४ रोजीच्या जाहिर प्रकटनाद्वारे ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा राहण्याचा पत्ता, मोबाईल नंबर बदलेला आहे व आज अखेर ज्यांच्याशी संपर्क झालेला नाही, अश्या लाभार्थ्यांनी तात्काळ योग्य त्या पुराव्यासह लेखी अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग
मुख्य कार्यालयात सादर करावा अन्यथा अश्या लाभार्थ्यांचा लाभ स्थगित केला जाईल याची दिव्यांग
लाभार्थ्यांनी नोंद घेणेबाबत जाहिर प्रकटन प्रसिद्ध करणेत आले होते.
तसेच सर्वेक्षणामध्ये १४७७ दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड महानगरपालिकेकडे सादर न केलेचे निदर्शनास आलेले आहे. तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत समाज विकास विभागात UDID कार्ड सादर केले नाही त्यांनी तात्काळ त्यांचे UDID कार्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिका, समाजविकास विभागाकडे सादर करावे.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे “हयातीचा दाखला” बाबत चे सर्वेक्षण झालेले नाही, त्यांची KYC झालेली नाही अश्या सर्व लाभार्थ्यांनी येत्या १५ दिवसात तात्काळ सर्वेक्षण करून घ्यावे तसेच UDID कार्ड पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामध्ये सादर करावे. अन्यथा अश्या सर्व लाभार्थ्यांचे लाभ स्थगित केले जातील. तसेच नोंदीसाठी www.pcmcdivyang.com या लिंकवर आपली माहिती भरणेत यावी व अधिक माहितीसाठी 8459834929 या क्रमांकावर कॉल करा, असे आवाहन सहा. आयुक्त दिव्यांग कक्ष समाज विकास विभाग यांनी केले आहे.














