न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- दारूच्या नशेत तरुणाने नदीत उडी मारली. ही घटना बुधवारी (दि. ७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपाला लागून असलेल्या मुळा नदीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने नदीत उडी मारल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणाला पोहत बाहेर येण्याचे आवाहन केले. तरुणानेही प्रतिसाद देत पोहण्यास सुरुवात केली.
काही वेळातच तरुण काठावर आला. पोलिसांनी तरुणाकडे चौकशी केली असता तो म्हणाला की, मी दारू पिल्यानंतर दुचाकीवरून नदीच्या पुलावर आलो. त्यानंतर नशेतच नदीत उडी मारली. माझी कोणाविरुध्द काहीही तक्रार नाही. दरम्यान, तरुणाचे नातेवाईकदेखील ठाण्यात आले होते.














