- मा. नगरसेवक ॲड. विनायक गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२४) :- वाकड परिसरात वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅरम स्पर्धेचे उद्घाटन मा. नगरसेवक ॲड. विनायक रमेश गायकवाड यांच्या हस्ते करीत सामन्यांची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी वेणुनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर राहटे, उपाध्यक्ष राजेंद्र बडगुजर, उपाध्यक्ष बी.आर.पाटील, सर्व सभासद आणि नागरिक उपस्थित होते.
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत, यामध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धा असणार आहेत. वेणुनगर ज्येष्ठ नागरिक सघ यांच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेस ज्येष्ठ सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. १४ ऑगस्ट पर्यंत स्पर्धा असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अंतिम सामना असेल.














