न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- कासारवाडी येथील यशवंत सोसायटीजवळ ड्रेनेजचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत ड्रेनेजचे काम करणारे मजूर गंभीर जखमी होऊन चार वर्षाचा बालक ठार झाला.
ड्रेनेजच्या कामासाठी खोलवर खोदकाम करत असताना शेजारी असलेल्या संरक्षक भिंतीला कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नाही. त्यामुळे भिंत कोसळून ही दुर्घटना घडली.
सनोज महिंद्रा ठाकूर (वय ३२, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार संतोष हन्नु राठोड (रा. मोहननगर, चिंचवड), सुपरवायझर यशोधर गावित (रा. थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.











