- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘विशेष पॉडकास्ट’द्वारे गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२४) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संस्था प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीजचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, सीएओ डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्य डॉ. क्षितिजा गांधी यांच्या सहकार्याने आय क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. जयश्री मुळे, डॉ. हर्षिता वच्छानी एचओडी ऑफ सी एस, तसेच प्रा. सुप्रिया गायकवाड व प्रा. उज्वला फलक त्याचबरोबर क्विक हिल फाउंडेशनचे संस्थापक अनुपमा काटकर, अजय शिर्के, गायत्री केसकर, सुगंधा, मृणाल तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलिस हवालदार अमोल चौगुले, पोलीस हवालदार रमीजा गोलंदाज यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विद्यावाणी 107.4 एफएम रेडिओ चॅनेलवर प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या सायबर वॉरियर्स क्लबचा अध्यक्ष दीपु सिंह यांची विशेष पॉडकास्टद्वारे मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सायबर सुरक्षा जनजागृती मोहिम सायबर शिक्षासाठी सायबर सुरक्षा अंतर्गत सायबर वॉरियर्सने केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित या मोहिमेत प्रतिभा कॉलेजच्या सायबर वॉरियर्सनी समाजातील सायबर सुरक्षेच्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढली असून, अनेक सायबर गुन्हे रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या विशेष पॉडकास्टमध्ये दीपु सिंह यांनी सायबर वॉरियर्सच्या कामगिरीची सविस्तर माहिती दिली, ज्यामुळे संपूर्ण कॉलेजच्या सन्मानात भर पडली आहे. विद्यापीठाच्या या सन्मानाने सायबर वॉरियर्सच्या कार्याला अधिक प्रतिष्ठा मिळाली आहे.
यामध्ये महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी यामध्ये सायबर क्लब प्रेसिडेंट दिपू सिंग, सेक्रेटरी ऑलिव्ह वर्गीस, कम्युनिटी डायरेक्टर संकेत पवार, मीडिया डायरेक्टर बतुल पारावाला यांनी प्रमुख नेतृत्व केले. तसेच सायबर वॉरियर्स राजश्री, पौर्णिमा, श्रुती, संजोगिता, सानिका, अथर्व, रूपाली, प्रीती, ओम, श्रावणी, सुरज, सौरव, अभिलाषा, संकेत, आकाश, पूजा कीर्ती, दिपु, बतुल, श्रेया, राहुल, संध्या, अमन, मानसी, जोशुवा, मृणाल, नागेश, हरीनि, रोनित यांनी सायबर गुन्ह्यांबद्दल आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली.
सायबर वॉरियर्सनी रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, बस स्थानके तसेच मॉल, पेट्रोल पंप, व्यवसायिक स्थळे क्लासेस यामध्ये जाऊन सायबर फ्रॉड विषयक माहितीचा प्रसार केला व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा दिला.











