न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२४) :- श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, सृजन फाउंडेशनचे कायदेशीर सल्लागार ॲड.संजय भसे, कबड्डी पंच वसंतराव झेंडे, प्रगतशील शेतकरी भागुजी काळोखे, योगाचार्य दत्तात्रय भसे, कामगार नेते मच्छिंद्र हगवणे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पर्यवेक्षिका शुभलक्ष्मी पाठक, पालक बंधू-भगिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इ. पाचवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केलेले विद्यार्थी व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच स्केटिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सचिव प्रा. विकास कंद यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सहशिक्षिका विनिता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहशिक्षिका स्नेहल शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.