- पणं जनजागृती खर्च ना चुकला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२४) :- लोकसभा निवडणुकीत शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध जनजागृती कार्यक्रम राबविले. त्यासाठी एकूण १५ लाख ८२ हजार २०८ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीत मतदान वाढण्यापेक्षा मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून महापालिकेने शहरभरात जनजागृती मोहीम राबविली. रेडिओ जिंगल्स करण्यात आल्या.
पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. डिजिटल वाहनांद्वारे मतदार जागृती करण्यात आली. एअर बलून लावणे, रोलिंग स्टेंडी, सेल्फी स्टॅण्डी लावण्यात आल्या होत्या. त्यासाठी एकूण १६ लाखांचा खर्च झाला आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कार्योत्तर मान्यता दिली आहे.














