न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२४) :- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील एमबीए व एमसीए मध्ये पदवी घेतलेले 251 विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट द्वारे रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे अमेरिकन डिलाईट कंपनीत एमबीए ची पदवी घेतलेला कृणाल परदेशी याला १९ लाख ५० हजाराचे तर एमसीए मध्ये पदवी घेतलेला रोहन राऊत याला ११ लाखाचे पॅकेज मिळाले आहे.
एमबीए मध्ये शिक्षण घेत असलेले नऊ विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबई येथे कॅम्पस अँबेसेडर इनोव्हेशन सेल उद्योजकता सेल विभागात निवड झाली. पुणे जिल्ह्यातून एकमेव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मालविका ओझा हिने सेट परीक्षेत प्राविण्य मिळविले.
नुकतेच महाविद्यालयाच्या एमबीए विभागात च्या प्राध्यापकांनी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केला त्यात राज्य शासनाच्या पुणे येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ यांच्या वतीने नवोदित उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात येथील एमबीए विभागातील प्राध्यापकांनी त्यांना मार्गदर्शन केले.
एमबीएचे विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे यांची आयआयटी मद्रास इनोवेशन सेल येथे व्यवसाय सल्लागारपदी नियुक्ती झाली या सर्वांचा कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी उद्योजक रमणलाल जैन, पी.आय.बी.एम. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे, खजिनदार डॉ. भूपाली शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच नाविन्यपूर्ण व त्यांच्यातील कलागुण हेरून त्यांना त्यांचा कौशल्याचा विकास करणारे शिक्षण प्राध्यापक वर्गांनी देण्याचे आवाहन करून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी वेळेतच उपलब्ध व्हावी यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन कार्यशाळेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना वारंवार येथे दिले जाते .तसेच नामांकित कंपन्या बरोबर सामंजस्य करारही विद्यार्थासाठी करण्यात आला आहे. रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या आई-वडिलांचेही स्वप्न पूर्ण होतात असे आपल्या मनोगतात डॉ. दीपक शहा शेवटी म्हणाले.