- रहाटणीत किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२४) :- दोघांनी “आमच्या अंगावर चिखल का उडवला, तुला लय माज आला आहे का, तुला आज संपवुनच टाकतो” अशी तरुणाला धमकी दिली. कमरेला लावलेला लोखंडी कोयता काढुन डोक्यावर वार केला.
हातातील लोखंडी रॉड डोक्यावर मारत असताना तरुणाने उजवा हातमध्ये केल्याने उजव्या बोटावर जखम झाली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०६) रोजी रात्री ११.३० वा चे सुमारास शिवराजनगर, लेन नंबर ०१, रहाटणी, काळेवाडी येथे वर्कशॉप समोरील रोडवर घडला.
विशाल नघु गायकवाड (वय ३० वर्षे, रा. साई कॉलनी, रहाटणी) यांनी आरोपी १) किशोर पांचाळ (वय २० वर्ष रा. गजानन नगर, रहाटणी, काळेवाडी), २) करण ऊर्फ मुन्ना गजानन चोपवाड (वय अंदाजे २४ वर्ष रा. शिवराज नगर, रहाटणी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ९६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९,११८ (२),११८ (१), ३(५), आर्म अॅक्ट ४,२५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५, सह किमीनल लॉ अॅमेडमेन्ट अॅक्ट कलम ३.७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र. १ याला अटक केली आहे. पोउपनि व्यंकट पोटे पुढील तपास करीत आहेत.












