न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ सप्टेंबर २०२४) :- गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुनब्बी निमित्त पिंपरीतील सावली केंद्र येथे गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक काळुराम पवार व माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व्यवस्थापन सेलचे अध्यक्ष अकबर मुल्ला यांनी आयोजन केले होते. काळुराम पवार, जितेंद्र ननावरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सर्व धर्मसमभाव मांडणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. पवित्र सणांच्या दिवशी कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती अन्नधान्य व इतर सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी हा एक छोटासा उपक्रम राबविला असल्याचे अकबर भाई मुल्ला यांनी सांगितले.
माजी नगरसेवक जितेंद्र नन्नवरे, काळूराम पवार यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला. ५० किलो तांदूळ तसेच अन्नधान्य किटचे वाटप गरजू नागरिकांना करण्यात आले. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यवस्थापन सेलच्या कार्याध्यक्ष अंजू बेंजामिन, अकबर भाई मुल्ला, कार्यकर्ते आयुब शेख, शुभम दोसिया, फरदीन शेख, पवन, गौतम परिश्रम घेतले.