न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- दहशत पसरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मयूर नगरी जवळ दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी घेऊन जात परिसरातून धिंड काढण्यात आली.
शशिकांत दादाराव बनसोडे आणि प्रथमेश अरूण इंगळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपळे गुरव आणि नवी सांगवीत दहशत माजविण्यासाठी दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती.
तसेच, पत्ता न सांगितल्याने गतिमंद तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. सांगवी पोलिसांनी दोन्ही आरोपींना काही तासांतच जेरबंद केले.

















