न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- ८० फूट उंचीवरून ड्रोन घिरट्या घालत होतं. ते पाहून तक्रारदार जमीन मालक ‘तुम्ही माझ्या मालकीच्या शेतात ड्रोन का उडवीत आहात? तुम्ही माझे जमिनीत अतिक्रमण करून ड्रोन वरती उडविला आहे? तुमचं नाव सांगा?, असं यांनी ड्रोन उडवणाऱ्याला तरुणाला हटकलं. त्यावेळी त्याने ड्रोन जमिनीवर उतरवला.
तेवढ्यात तेथे तक्रारदार यांच्या वस्तीतील लोक जमा झाले. त्यांनी ११२ नंबर वर फोन करून पोलीसांना बोलावले. जमिनीत अतिक्रमण करून ड्रोन उडवून थांबवला, अशी तक्रार तक्रारदार यांनी पोलिसांनी दिली. त्यावरून त्याला ताब्यात घेतले आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी पहाटे ०२.३० वा.चे सुमा. चाकण गावच्या हद्दीत जमीन गट नंबर ७५७ येथे घडला. बाळू विष्णू वाडेकर (वय ५४ वर्ष धंदा शेती राहणार चाकण) यांनी आरोपी राकेश राजू केदारी (वय ३७ वर्ष राहणार चाकण) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चाकण पोलिसांनी ६५५/२०२४ भा न्या सं कलम ३२९ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा रेंगडे तपास करीत आहेत.