- चंद्रकांत नखाते यांच्या वतीने विसर्जन हौदाची सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी- लाडक्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्यासाठी माजी नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते यांच्या वतीने नखाते पेट्रोल पंप, राहटणी येथे कृत्रिम विसर्जन हौद तयार करण्यात आला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, थेरगाव भागातील गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन करुन त्यांना पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घातली. भाविकांना भक्तिमय वातावरणात प्रत्यक्ष हौदात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा आनंद घेता आला.
पवना धरण शंभर टक्के भरल्यामुळे नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहरातून वाहणा-या पवना नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने गणरायांचे विसर्जन करण्यासाठी पवना नदी घाटांवर नदीपात्रातील पाण्यात उतरण्यास प्रतिबंध घातले आहेत. नागरिकांना भक्तीमय वातावरणात गणरायांचा निरोप घेता यावा, हिंदु परंपरेनुसार विधीपूर्वक विसर्जन करता यावे, यासाठी माजी नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते यांच्या वतीने रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंप येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कृत्रिम विसर्जन हौदाची निर्मिती केली होती. आपल्या लाडक्या बाप्पांचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यासाठी सर्व भाविकांनी याठिकाणी येऊन आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन देखील चंद्रकांत (आण्णा) नखाते यांनी केले होते.
त्यानुसार चिंचवड मतदार संघातील रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, पिंपळे सौदागर भागातील गणेश भक्तांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तींचे येथील कृत्रिम हौदात भक्तिमय वातावरणात विसर्जन केले. गणेश भक्त घरगुती मूर्तीचे हौदातील पाण्यामध्ये स्वतः विसर्जन करून त्या मूर्ती संकलन केंद्रात जमा करत होते. सुमारे 4 हजार 231 एवढ्या गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. शुभम नखाते युवा मंचचे सुमारे 30 कर्मचारी गणेश मूर्ती संकलन कार्यात सहभागी होते.














