न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२४) :- पदाचा आणि दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला. दोघांनी संगणमताने (दि. ११/१०/२०१९ ते दि. ०६/०४/२०२१) या कालावधीत ताथवडेतील श्री बालाजी सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या अकाऊंट विभागास, संस्थेच्या अत्यावश्यक कामांकरिता रक्कम खर्च करावयाची असल्याचे कारण दिले.
वेळोवेळी नमूद विभागाकडून संस्थेच्या चालू खात्यांचे कोरे धनादेश मागवून घेतले. त्याव्दारे आस्थापनांकडून शैक्षणिक संस्थेकरिता कोणत्याही सेवा व वस्तु न घेता आस्थापनांचे बिल/इनव्हाईस संस्थेकडे सादर केले. संस्थेच्या कार्यपध्दतीचा भंग केला. संस्थेने टाकलेल्या विश्वासाचा विश्वासघात करुन धनादेशांव्दारे विविध आस्थापनांचे बँक खात्यामध्ये श्री बालाजी सोसायटी या संस्थेचा एकूण निधी रक्कम रूपये २,९९,४१,५२४ वळता करुन निधीचा अपहार केला, असं फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी परमानंधन बालासुब्रमनियन (वय ४८ वर्षे) यांनी आरोपी १) परनधामन बालासुब्रमनियन हिं. (वय ५१ वर्षे, रा. कुमार सिटी, कल्याणी नगर, पुणे), २) निखिल नटवर अगरवाल, हिं. (वय ३४ वर्षे, रा. बावधन, एन.डी.ए. पाषाण रोड, पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी १०४३/२०२४ भा.दं. वि. कलम ४०६,४०८,३४ प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि पोटे तपास करीत आहेत.