न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२४) :- ग्रामपंचायतीचा सरकारी पंपहाऊस चालु करण्यसाठी लागणारी पॉलीकॅप कंपनीची ८०,००० रु किं ची थ्री कोर १० sqqmm नविन ५०० मिटर लांबीची केबल ज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.
पोलवरती कनेक्शनसाठी बांधुन ठेवलेली असताना त्याची चोरी झाली आहे. हा प्रकार (दि. २२) रोजी ११.०० वाजता ते (दि. २३) रोजी ८.३० च्या दरम्यान धामणे, चांदखेड ता. मावळ जि.पुणे येथे उघडकीस आला.
याप्रकरणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. यावरून शिरगाव पोलिसांनी २१८/२०२४ भा.न्या.सं.क ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मपोहवा आघाव पुढील तपास करीत आहेत.












