न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२४) :- हॉटेलच्या मधील फॅमिली रूममध्ये दारूच्या नशेत झालेल्या भांडणाच्या कारणावरून आणि जेवण बनवण्यास नकार दिल्याचे कारणावरून हॉटेल मधील वेटरने दुसऱ्या वेटरला शिवीगाळ व हाताने मारहाण केली.
हॉटेलच्या किचन रूममधून ऊस तोडण्याचा कोयता आणून ‘तुला आता कायमचाच संपवतो’ असे म्हणत कोयत्याने दुसऱ्या वेटरच्या मानेवर, हातावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २४) रोजी रात्री ००.३० वाचे सुमारास घडला.
आशिक अब्बास अली शेख (वय ३१ वर्षे, वेटर) याने आरोपी आयुब अब्दुल शेख (वय ३८ वर्षे, धंदा वेटर) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. आळंदी पोलिसांनी २८९/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम १०९ आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि साळी पुढील तपास करीत आहेत.












