न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२४) :- चिंचवड येथील निरामय हॉस्पिटल समोरील मेडिकल दुकानात कर्करोग या आजारासाठी वापरणारे Adcetris या बनावट इंजेक्शनची विक्री होत होती. हा प्रकार (दि.२४) रोजी ७.०० वा दरम्यान उघडकीस आला.
फिर्यादीच्या कंपनीचा स्वामीत्व असलेल्या ३,५०,०००/- रु किं चा माल दुकानात निदर्शनास आला. याप्रकरणी फिर्यादी महेश विष्णु काबळे (वय. ४२ वर्षे) यांनी आरोपी श्रीप्रसाद श्रीहरी कुलकर्णी (वय ४२ वर्षे धंदा. मेडिकल शॉप) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
पिंपरी पोलिसांनी ८५४/२०२४ कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, ६४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि डोंगरे पुढील तपास करीत आहेत.












