- नागरिकांनी फ्रॉड एसएमएसला बळी पडू नये; पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी एसएमएसद्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.
परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री ९ वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे राकेश मिश्रा, महापालिका अधिकारी या नावाने व 8009015135 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करणारा फसवणूकीचा एसएमएस पाठविण्यात येत आहे, असे एसएमएस हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.












