न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२४) :- २४ वर्षीय महिलेने “ए येतोस का ५०० रुपये लागतील” असे अश्लिल हावभाव करुन व अश्लिल शब्द उच्चारुन सार्वजनिक रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या इसमांना अडथळा होईल तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी कृत्य केले.
हा प्रकार (दि.०१) रोजी दुपारी १.३० वा. सुमा दिघी मॅगझीन चौक येथील टॉयलेट जवळ, सार्वजनिक रस्त्यावर घडला. याप्रकरणी महिलेच्या विरोधात दिघी पोलिसांनी ४१९/२०२४ अनैतिक व्यापार प्रतिबंधक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ (पिटा अॅक्ट) चे कलम ०८ नुसार गुन्हा दाखल केला असून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) प्रमाणे तिला नोटीस देण्यात आली आहे. पोउपनि ढेरे तपास करीत आहेत.