न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२४) :- चाकण पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून आरोपींकडून १७ गुन्हे उघड केले आहेत. १२ लाख रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत.
गुन्हयातील चोरीची वाहन घेवून जात असताना ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आलं, गोपनिय बातमीदारकडून तीन संशयीत आरोपीने गुन्हा केल्याच्या सिद्ध झाले. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यानी माहितीच्या अनुषंगाने आरोपी राहूल शिवाजी राठोड, फारूक अन्सर पठाण व विशाल दिलीप करपते यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. काही वाहने त्यांचेकडे मिळाले.
आरोपींनी चाकण, आळंदी, म्हाळुंगे एमआयडीसी, भोसरी, खोपोली, लोणावळा, सोलापूर, औरंगाबाद व अकोला जिल्हयातील पोलीस ठाणे येथून शाईन व स्प्लेंडर मोटार सायकल तसेच अॅटो रिक्षा चोरी केली असल्याची कबुली दिली. आरोपीतांकडून एकुण १२,००,००० लाखांच्या रिक्षा जप्त केलेल्या असून त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात तपास पथकास यश आले आहे.


















