न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२४) :- रस्त्यावरील लोखंडी खांबाचे काम करत असताना सुरक्षितता बाळगणे गरजेचे होते. कॉट्रक्टर व त्याच्या हाताखालील आरोपी यांनी हायगीने व निष्कळाजीपणाने इतराच्या जिवीताला धोका निर्माण होईल असे कृत्य केले.
अनुपकुमार शुक्ला (वय ५७, रा. श्रीकृष्णनगर काळेवाडी) याच्या डोक्यामध्ये लाईटचा लोखंडी पोल पडुन त्याला गंभीर जखमी केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि.०२) रोजी सकाळी ११.३० वा. क्रॉमा शोरुम समोरील ब्रिजवर घडला.
याप्रकरणी १) ऋषिकेश हनुमंत थोरात वय ३२ रा. बिजलीनगर चिचवड), २) विजय तपन्ना राठोड (वय १९), ३) रामु रुपशी राठोड (वय ३५ वर्ष), ४) तपन्न कसनु राठोड (वय ५० वर्ष रा. शांतीनगर, भोसरी), ५) जितेद्र रामदास वाकुडे (वय २८ रा आकुर्डी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात ८७६/२०२४ भा.न्या. संहिता १२५ (ए), १२५ (बी), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि दलालवाढ पुढील तपास करीत आहेत.













