न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) :- टेम्पो चालकाकडे ‘धंदा करायचा असेल तर तीन हजार रुपये दर महीना मला हफ्ता दयावा लागेल’, अशी मागणी केली. त्यास नकार दिल्याने शिवीगाळ करीत टेम्पो जाळुन टाकण्याची धमकी देत प्रत्यक्ष टेम्पोस आग लावली. त्यामुळे टेम्पोचा टायर, इंजिन, ड्रायव्हींग सिट व इतर पार्टचे मिळुन ४० हजार रुपयाचे नुकसान झाले.
हा प्रकार (दि.०३) रोजी रात्री १०.३० वा ते (दि. ०४) रोजी रात्री ३.०० वा दरम्यान इंद्रायणी नगर कॉर्नर, उषाकिरण हॉटेल समोर, इंद्रायणीनगर भोसरी येथील सार्वजनिक रोडवर घडला.
फिर्यादी साजिद इत्तम सय्यद (वय २४ वर्षे, सदगुरुनगर, भोसरी) यांनी आरोपी अक्षय बळीराम खळगे (वय-२९ वर्ष, रा. बालाजीनगर, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी-भोसरी पोलिसांनी ५०७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२६ (फ), ३०८ (२), ३२४(२),३५२ प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.












