न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) :- तनिश ऑर्चीड सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासद यांना बिल्डरने महानगरपालिकेचा बांधकाम प्रकल्प पुर्णत्वाचा दाखला, महारेराने निर्देशीत केलेल्या वेळेत निवासी गृहप्रकल्प पुर्णत्वाचा दाखला आणि छापील ब्रोशरमध्ये देऊ केलेल्या अॅमेनिटीज तसेच मेटेंनन्सच्या नावाखाली वसुल केलेल्या रक्कमेचा हिशोब दिला नाही. सोसायटीच्या जागेचे अभिहस्तांतरण (Conveyance Deed) सोसायटीच्या नावे करुन दिले नाही, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १८/०२/२०२३ ते दि.०२/१०/२०२४ पर्यंत) तनिश ऑर्चिड सोसायटी, च-होली बुा. ता. हवेली, पुणे येथे घडला. फिर्यादी संदीप विश्वनाथ नाईकवाडे (वय ४१ वर्ष, रा. तनिश ऑर्चिड सोसायटी, च-होली बु.) यांनी आरोपी मे. तनिश असोसिएटसचे भागीदार १. राजु मोहनलाल मेहता, २. श्रेणीक निर्मल परमार, ३. दिलीप शांतीलाल सोलंकी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी ४२४/२०२४ मोफा कायदा कलम. ३, व १३ नुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा / ७०० गवारी पुढील तपास करीत आहेत.












