न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२४) :- महापालिकेने ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर लेन नंबर ४ येथील रस्त्यालगत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
अनधिकृत पाच मजली इमारतीवर सकाळी अकराच्या दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने कारवाइ करण्यात आली. ही अतिक्रमण कारवाई क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
यावेळी बांधकाम अतिक्रमण विभाग कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे, अतिक्रमण बीट निरीक्षक सुहास भगत, प्रीती यादव, ओमकार देशमुख, संदीप पाटील, पूजा राठोड, शेषराव आतकोरे आदी अधिकारी कारवाई प्रसंगी उपस्थित होते.
चार ते पाच हजार चौरस फूट क्षेत्रावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी, मजूर, अतिक्रमण विभागाची दोन वाहने, एक जेसीबी, एक ट्रॅक्टर ब्रेकर आदी साहित्य सामग्रीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.












